सोमेश्वर कारखान्याचे पत्र आणि पीडब्ल्यूडी ची तत्परता : उसाच्या वाहतुकीस अडथळा ठरणारे स्पीडब्रेकर हटवले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा बारामती रस्त्यावर करंजेपुल येथे उसाच्या बैलगाड्याना अडथळा ठरणारे स्पीडब्रेकर हटवून वेगळया प्रकारचे स्पिडब्रेकर केले. याठिकाणी बैल घसरून अनेक अपघात झाले होते. 
           याबाबत सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी बारामती बांधकाम विभागाशी पत्रव्यहवर केला होता. संचालक ऋषी गायकवाड यांनी स्वतः त्याठिकाणी उभे राहून चोख काम करून घेतले. कारखान्याने दिलेल्या पत्रात म्हणटले होते की, करंजेपूल ता. बारामती जि.पुणे येथे निरा बारामती रस्त्यावर एकत्रीत तीन स्पीड ब्रेकर केले आहेत. त्यामुळे आमचे श्री सोमेश्वर सह. साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या एकत्रित असलेल्या स्पीड ब्रेकरमध्ये गुंतूण बसतात. तसेच बैलांच्या खांद्याला जोट्याचे हिसके बसतात व खांद्याला जखमा होतात.
तरी सदर ठिकाणी एकच कमी उताराचा स्पीड ब्रेकर ठेवावे असे पत्रात म्हणटले होते.
To Top