सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवारी (दि.२७) रोजी बारामतीच्या पश्चिम भागातील नियोजित दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटने पार पडणार आहेत.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर झालेल्या सभेनंतर सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीनंतर अजित पवार यांचा हा दौरा होत असल्याने पश्चिम भागातील नागरीकांचे पवार यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.
सकाळी साडेसात वाजता वडगाव निंबाळकर येथे उदघाटन, आठ वाजता निंबुत येथील समता पॅलेस व समता रॉयल तसेच प्रसन्न पेट्रोलियमचे उदघाटन होणार आहे. यानंतर सकाळी नऊ वाजता निंबुत येथील बाबा कमल पशुवैद्यकीय दवाखान्याचे उदघाटन, बा. सा काकडे विद्यालयाच्या नविन इमारतीचे उदघाटन व यानंतर सभा होणार आहे.
दहा वाजता उद्योजक आर एन शिंदे यांच्या विहिरीवर पाणी पूजन, यानंतर मुगटराव काकडे महाविद्यालयात सकाळी साडेदहा ते साडेअकरा पर्यंत आर एन शिंदे सभागृह उदघाटन तसेच कोनशिला अनावरण व जाहीर सभा असे कार्यक्रम पार पडणार आहेत. दुपारी २ वाजता वाघळवाडी येथे विविध विकासकामांचे उदघाटने होणार आहेत. माजी खा. राजू शेट्टी, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ नेते शामकाका काकडे, सुनेत्राताई पवार, आ. संजय जगताप, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सतिश काकडे, प्रमोद काकडे, पुरुषोत्तम जगताप, नीता फरांदे यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.