सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा चेहरामोहरा बद्दलण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ४० कोटींचा निधी देण्यात येणार असून अंगणवाड्या व शाळा दुरुस्त्या, दर्जेदार व चांगले शिक्षण मिळण्यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
निंबुत ता बारामती येथे समता पतसंस्थेने बांधलेल्या समता पॅलेस, समता रॉयल व प्रसन्न पेट्रोलियम उदघाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, काका कोयते, सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर, नीता फरांदे, उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, इलेक्ट्रिक गाडांचा जमाना आला आहे. वाढत्या पेट्रोल अणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्ष्यात घेता. सीएनजी व चार्जिंग सेंटर उभारणीस प्राधान्य देण्यात येत आहे तसेच महिलांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार ने कर कमी केला आहे. समता पतसंस्थेने उभारलेले कार्यालय दर्जेदार असून या संस्थेने वर्षतून एकदा तरी सामुदायिक विवाह सोहळा घावा आशा सूचना पवार यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप फरांदे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी तर आभार युवराज फरांदे यांनी मानले.