सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल अप्पर पोलिस अधीक्षक अजीत बोराडे यांनी आज दि.६ रोजी वाई पोलिस ठाणे हद्दीत विना परवाना शस्त्रे बाळगणार्यान वर पाळत ठेवून पिस्तुलसह आरोपी गजाआड करण्याचे आदेश दिले होते
या आदेशांचे पालन करुन अधिकारी आणी पोलिस कर्मचारी सकाळ पासूनच पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना खबर्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे वाई मेणवली रोड वर असणारे राजयुग कृषी पर्यटन हॉटेल परिसरात सापळा लावुन बसले होते .वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे पिएसआय कृष्णा पवार डिबी पथकाचे सहाय्यक उपनिरीक्षक विजय शिर्के प्रसाद दुदुस्कर किरण निंबाळकर श्रावण राठोड सुमीत मोहिते अभय नेवसे हेमंत शिंदे सोनाली माने स्वाती सुतार आणी महिला पोलिस तांबे चालक धुमाळ या सर्वांनी
हॉटेल वर टाकलेल्या धाडीत विना परवाना एक पिस्तूल सह ५ आरोपींच्या सिनेस्टाईल झटप घालत मुसक्या आवळल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ ऊडाली आहे. प्रसाद दुदुस्कर या पोलिस जवानाने प्राणाची बाजी लावून आरोपी वर झडप टाकुन पिस्तुल ताब्यात घेण्यास यशस्वी झाल्या बद्दल वाईकर नागरिकांन सह डिवायएसपी शितल खराडे जानवे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी कामगीरी फत्ते केल्या बद्दल अभिनंदन केले आहे . वाई पोलिस ठाण्याने अचानक सुरु केलेल्या धाडसत्रा मुळे वाई तालुक्या सह सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत . या वेळी सातारा येथील ठसे तज्ञांचे पथक बोलविण्यात आले आहे .