नीरा- बारामती रस्त्यावर 'त्या' अपघातग्रस्त युवकाने "देवदूत" पाहिला. . !

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर टिम - - - -
बारामती दि ६
 

  आपण नेहमीच अपघाताच्या बातम्या वाचत असतो यामध्ये अपघातग्रस्त व्यक्तीना वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक जण आपले अनमोल जीव गमावून बसतात .तर काही अपघात ठिकाण नागरिक फक्त बघ्याची भूमिका घेतात. नको ती कोर्ट कचेरी आणी पोलिस स्टेशनची झंझट   म्हणुन मदतीला कुणी पुढं धजावत नाही  त्यामुळे असं वाटतं की  माणुसकी शिल्लक राहिली नाही.

 पण याला अपवादात्मक एक घटना काल बारामती तालुक्यात घडली.  नीरा - बारामती रस्त्यावरुन निंबूत नजीक एक युवक लग्न कार्यक्रम उरकून दुपारी साडेतीनच्या दरम्यान स्वत च्या घराकडे मोटारसायकलवरून निघाला असतात. नीरा -बारामती रस्त्यावरती त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली व तो रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडला होता.रस्त्यावरून जाणारी वाटसरू फक्त बघ्याची भूमिका घेत होते त्याच वेळेस रस्त्यावरून बाळासाहेब काकडे उपाध्यक्ष ,बारामती तालुका साखर कामगार सभा  हे कामानिमित्त बाहेर निघाले असता त्यांना हा  अपघात नजरेस आला ते तत्काळ त्या अपघातग्रस्त युवकाच्या जवळ जात  त्याला मांडीवर घेत त्याची विचारपूस करत त्याला  झालेली दुखापत पाहिली व ही जीवघेणी असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली त्यांनी वेळ न दवडता तात्काळ रूग्णवाहिकेला पाचारण केले . रुग्णवाहिकाही वेळेत हजर झाली व त्या युवकाला साईसेवा हॉस्पिटलमध्ये तातडीने  दाखल करण्यात आले व पुढील उपचार सुरू करण्यात आले.

बाळासाहेब काकडे यांनी दाखविलेले प्रसंगावधान हे  युवकास देवदूता सारखेच होते त्यामुळे जखमी युवकाला वेळेवर उपचार मिळाले व त्या एकोणीस वर्षीय युवकाचे प्राण वाचले.


To Top