सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यामध्ये सोसायट्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे काही गावामध्ये आदर्शवत पध्दतीने सर्वांशी सकारात्मक चर्चा करून बिनविरोध पध्दतीने निवडणुका पार पाडल्या जात आहेत पण बारामती तालुक्यातील मुढाळे येथील गावामध्ये सोसायटीच्या निवडणुकीच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली .याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यांमध्ये दोन गटांतील व्यक्तींवर एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
निवडणुकीमध्ये पराभूत पॅनलचा प्रचार केला म्हणून एकाला किराणा दुकानासमोर लोखंडी गजाने मारहाण केल्याची फिर्याद दाखल झाली आहे.तर त्यानंतर पराभूत झालेल्या पॅनेलकडून पराभवाच्या कारणांवरून विजय पॅनलमधील उमेदवारांना लोखंडी गजाने चोप दिल्याची घटना घडली असून तब्बल तेरा जणांवर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार मणेरी करीत आहेत