सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी
सुसाट्याच्या वाऱ्यामुळे वाईच्या पुर्व भागात ज्वारी गहु आणी ऊस जमीन दोस्त झाल्याने शेतकर्यांन मध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वाई तालुक्यातील पुर्व भागात अचानक पणे सुसाट वारे वाहू लागल्याने ज्वारी ऊस आणी गहू हि पिके काढणी काटणी आणी मळणीच्या उंबरठ्यावर ऊभी असतानाच अचानक पणे पावसाच्या हलक्या सरी कोसळत असताना सुसाट वार्याच्या दाब वाढल्याने हि पिके जमीन दोस्त झाल्याने शेतकर्यांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर अनेक ठिकाणी मोठ मोठी झाडे तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या या विध्दुत तारांन वर कोसळल्याने खांब मोडून पडल्याने वाई शहरासह तालुक्यातील गावांन मधील विध्दुत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना अंधारातच
रहावे लागले याची माहिती वाईचे विध्दुत मंडळाचे ऊपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी यांच्या सह वाई शहरातील विध्दुत मंडळाच्या इतर अधिकारी वर्गांला समजताच त्यांनी वायरमन पथकाला एकत्रीत करुन युध्द पातळीवर विध्दुत पुरवठा सुरळीत सुरु करण्या साठी प्रयत्न करण्याच्या सुचना दिल्या या पथकातील कर्मचार्यांनी अंधारात सुध्दा स्वताच्या जिवाची पर्वा न करता खांबांनवर चढुन झालेला बिघाड शोधण्या साठी प्रयत्नांची
पराकाष्ठा करताना दिसत होते .आणी रात्री ऊशीरा का होईना वाईकर नागरिकांना विध्दुत पुरवठा सुरळीत करुन दिलासा दिला .पुर्व भागातील अनवडी या गावातील संजय गीरी यांच्या घरा समोरील रस्त्या कडेला असणारे बलाढ्य बाभळीचे झाड लाईटच्या खांबावर कोसळल्याने खांब तुटुन पडल्याने विध्दुत पुरवठा खंडीत होऊन रस्त्यावर झाड पडल्याने त्या वरील वाहतुक पुर्ण पणे बंद झाली होती .