सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बाजारवाडी - धावडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर आमदार संग्राम थोपटे यांचे वर्चस्व राहिले असून चेअरमन पदी राजेंद्र नथू शिंदे , व्हा चेअरमनपदी रामचंद्र पांडूरंग गोळे यांची चिट्टीवर निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे , सचिव विजय चव्हाण यांनी निवडणूकीचे काम पाहिले. एकूण १३ जागेसाठी निवडणूक प्रक्रिया होऊन तीन जागा रिक्त राहिल्या तर १० जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये काँग्रेस पक्षाला ५ तर राष्ट्रवादीला ५ अशा समान जागा मिळाल्या. मंगळवार ( दि. २२) रोजी चेअरमन , व्हा. चेअरमन या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. यामध्ये चेअरमन या पदासाठी राजेंद्र शिंदे , संदिप शिंदे यांनी अर्ज भरला होता. परंतु मतदार समान असल्यामुळे अधिकाऱ्यांनी दोन्ही जागेवर चिट्टीचा फाँरुमला वापरून यामध्ये काँग्रेसचे राजेंद्र शिंदे विजयी झाले. तर व्हा. चेअरमन पदासाठी यशवंत मानकर , रामचंद्र गोळे यांनी अर्ज भरला होता. यामध्ये काँग्रेसचे रामचंद्र गोळे विजयी झाले. तर काँग्रेसकडून मारुती तुकाराम चव्हाण , यमुनाबाई लक्ष्मण खोपडे , रामचंद्र पाडूरंग गोळे , बबन दगडु चव्हाण , राष्ट्रवादीकडून संदिप आनंदा शिंदे , यशवंत जबाजी मानकर , ज्ञानोबा गेनबा गर्जे , शालन आनंदा राऊत यांची संचालक पदी निवड झाली. सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालकाचा सत्कार करण्यात आला.
आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेती संदर्भात असणारे हिताचे प्रश्न ,शुन्य टक्के व्याज सवलत , शासनाच्या विविध योजना याचा लाभ शेतकऱ्यांना करुन देणार असे नवनिर्वाचिॕत अध्यक्ष राजेंद्र शिंदे , उपाध्यक्ष रामचंद्र गोळे यांनी सांगितले .