शाब्बास भले ..! पाच गुंठेत पन्नास हजार : खंडाळा तालुक्यातील बावकलवाडीत काकडी आंतरपीकातून उत्पन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
लोणंद : प्रतिनिधी
खंडाळा ता बावकलवाडी येथील प्रगतशील शेतकरी
  बाळासाहेब गोविंद शेंडगे यांनी उसात काकड़ी या पिकाचे  आंतर पीक ५ गुंठे क्षेत्रात अडीच महीन्या त घेतले. आत्तापर्यंत त्या शेतामध्ये  निव्वळ पन्नास हजार रुपये काकडी पिकामध्ये नफा घेतला आहे.त्यांनी हा नफा 
नियोजन करून बाजारपेठेचा अभ्यास  करून यातून साध्य केले.  
            त्यांनी काकडीची 'शांताला' ही वाण (वेलकम् काँप सायन्स प्रा.लि.) वापरून त्यात कोबडी खत 450 किलो, शेणखत 450किलो,गोमूत्र 100लिटर, जैविक बक्टेरिया 1लिटर ही खते दिली. त्यांनी 5 गुंठे क्षेत्रात 20 क्विंटल काकडीत उत्पन्न मिळाले. त्यांनी हा माल शेतकरी ते ग्राहक या पद्धतीने निरा, लोणंद, खंडाळा , शिरवळ, भोर या बाजारपेठेत त्यांनी काकडी हे पिक विकले.
त्यांना या प्रक्रियेत  कृषि विभाग महाराष्ट्र शासनाचे यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन केले.
काकडी पिकाला मार्गदर्शन करताना यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी अशोक आघाव , बावकल वाडीचे सरपंच प्रदीप कांबळे,बावकल वाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण बिचुकले,प्रगतशील शेतकरी बाळासाहेब शेंडगे, परिसरातील काकडी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
To Top