वाई ! आशा स्वयंसेविका याच खऱ्या समाजसेविका : डॉ शीतल जानवे-खराडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी 
अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये कमी मानधनावर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका याच खऱ्या समाजसेविका आहेत आशा स्वयंसेविकांना खचून न जाता समाजाप्रती आपले काम असेच चालू ठेवावे भविष्यात त्या नक्कीच यशस्वी होतील. जीवनात कोणत्याही काम प्रामाणिकपणे केले तर त्यामधून चांगल्या प्रकारे समाजसेवा घडू शकते समाजासाठी आशाताईंच्या कामाचे योगदान फार महत्त्वाचे आहे असे मत आशाताई गौरव दिनी वाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे यांनी व्यक्त केले. 
       कोविड महामारीमुळे दोन वर्ष रखडलेला आशा स्वयंसेविका दिवस वाई पंचायत समितीच्या किसनवीर सभागृहामध्ये नुकताच साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. जानवे खराडे बोलत होत्या. यावेळी वाई पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी कुचेकर माजी सभापती संगीता चव्हाण रजनी भोसले माजी सदस्या सुनिता कांबळे मधुकर भोसले पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप यादव यांची प्रमुख उपस्थिती होते.
          हा कार्यक्रम वर्षातून एक दिवस साजरा केला जातो यावेळी आशा स्वयंसेविकांचे आरोग्य तपासणी केली जाते तसेच त्यांना आरोग्यविषयक आपणा कार्यक्रम राबवला जातो आशाताई यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा प्रमाणपत्रावर ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. 
    डॉ संदीप यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आराेग्य कार्यालय कर्मचारी व तालुका समूह संघटक प्रशांत मांढरे गणेश यादव तालुका आरोग्य कार्यालयातील मनोज कुमार पिठे आरोग्य सहायक रवी जाधव  यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. नरेंद्र सणस यांनी ले प्रशांत मांढरे यांनी आभार मानले यावेळी तालुक्यातील आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
To Top