सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील कोंढावळे या गावातील रहिवासी असलेला नारायण यशवंत कोंढाळकर वय ३८ याने तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय विवाहित तरुणीवर दि.१५ रोजी जबरदस्तीने भर दिवसा दुपारी १२|३० वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसल्याचा गैर फायदा घेऊन बलात्कार केला . याची वाच्चता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली असल्याने तात्काळ गुन्हा दाखल होऊ शकला नाही पण तिला त्रास होऊ लागल्याने आणी कधीतरी घरातील लोकांना कळल्यावर आपले
नांदणे अवघड होईल याचा विचार करून पिडीत महिलेने घडल्या प्रकाराची माहिती कुटुंबातील लोकांना सांगितली हा प्रकार गंभीर असल्याने आज दि.२५ रोजी पिढीत महिलेने कुटुंबा समवेत वाई पोलिस ठाण्यात येऊन अखेर या बाबतची तक्रार दाखल केली. या गंभीर तक्रारीची माहिती पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी तात्काळ पिएसआय के.डी.पवार यांना बोलावून घेऊन यातील आरोपी असलेला नारायण यशवंत कोंढाळकर यास ताब्यात घेऊन अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या .
पिएसआय के.डी.पवार यांनी तात्काळ आपले सहकारी सोबत घेऊन कोंढावळे गावात जाऊन आरोपी पलायन करण्या आधीच सापळा लावुन त्यास ताब्यात घेऊन वाई पोलिस ठाण्यात आणुन घडल्या प्रकाराची विचारपूस केली असता त्यांने ऊडवा ऊडवीची ऊत्तरे देताच पिएसआय के.डी. पवार यांनी पोलिसी खाक्या दाखवताच नारायण कोंढाळकर याने बलात्कार केल्याची कबुली दिल्याने त्याच्या वर गुन्हा दाखल करून त्यास वाईच्या न्यायालया पुढे ऊभे केले असता त्याला न्यायालयाने ३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आरोपी नारायण यशवंत कोंढाळकर वय ३८ राहणार कोंढावळे ता.वाई याने पिडीत २२ वर्षीय विवाहित महिलेला स्वताच्या राहत्या घरात भर दिवसा दुपारी १२| ३० वाजण्याच्या सुमारास बोलावून तुला माझ्या बायकोने गहू देण्यास सांगितले आहे पण टिपाचे झाकण उघडत नाही तर तु घरात ये आणी आपण दोघे टिपाचे झाकण ऊघडु असा बनाव करुन पिडीत महिला घरात येताच व घरात कोणी नसल्याचा गैर फायदा घेऊन आरोपी नारायण कोंढाळकर याने घराचा मुख्य दरवाजा आतुन कडी लावून बंद करून बलात्कार केला असल्याची माहिती दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे .या दाखल गुन्ह्याचा अधिक तपास डिवायएसपी शितल खराडे जानवे आणी पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शना खाली पिएसआय के.डी.पवार हे करीत आहेत .गेल्यां दोन महिन्यांत हा बलात्काराचा दुसरा गंभीर स्वरूपाच्या या दाखल गुन्ह्या मुळे वाईच्या पश्चिम भागात एकच खळबळ उडाली आहे .