पुरंदर ! जेजुरीकर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घरपट्टी व पाणीपट्टी भरून पालिकेला सहकार्य करावे : मुख्याधिकारी मोरे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जेजुरी : वार्ताहर  
जेजुरी नगरपालिकेने २०१८-१९ ते २०२१ -२०२२ या वित्तीय वर्ष्याच्या मालमत्ताकर आकारणी मध्ये ४० टक्के इतक्या दराने वाढ केली होती.पुरंदर भोरचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून वाढीव दराने झालेली कर आकारणी २० टक्के दराने कमी केली आहे.शासनाने निश्चित करून दिलेल्या दरामध्ये बदल करण्याचा अधिकार पालिकेला नाही.जेजुरी शहरातील मालमत्ता धारकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नगरपालिकेस घरपट्टी व पाणी पट्टी भरून सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी निखील मोरे यांनी केले आहे. 


        कोव्हिड १९ चच्या काळात साथीचा रोग संपूर्ण देशात पसरल्यामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते.त्यामुळे जेजुरी शहरात खंडोबा देवाच्या दर्शनासाठी भाविक येणे बंद झाले.सर्व आवक जावक थंडावली ,नागरिकांचा उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाल्याने नगरपालिकेच्या वसुलीवरही त्याचा परिणाम झाला होता. तसेच सध्या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रसार माध्यमाद्वारे व वाटसप द्वारे घरपट्टी न भरणे बाबत प्रसार केला जात आहे. या प्रसारामुळे घरपट्टी भरणे बाबत नागरिकांच्यात संभ्रम निर्माण केला जात आहे. शासनाने दरवर्षी पाच टक्के दराने मालमत्ता कर आकाराला आहे. या दरात बदल करण्याचा अधिकार नगरपालिकेला नाही असे निखील मोरे यांनी सांगितले. 
          जेजुरी नगरपालिकेस पाणी पुरवठा,आरोग्य लाईट व्यवस्था आदी सुविधा नागरिकांना पुरवाव्या लागतात.जेजुरी शहरास नाझरे धरण व मांडकी योजनेतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.सध्या मांडकी डोहावरील वीज पुरवठा खंडित केल्या मुळे नाझरे धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. नाझरे धरणात आणखी दोन महिने पुरेल इतका पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे शहराला दररोज पाणी पुरवठा करणे अडचणीचे ठरत आहे.मांडकी डोहावरील थकीत बिलाची रक्कम भरणे करिता जेजुरी पालीकाकडे निधी अपुरा आहे. शहरात पाणी पुरवठा नियमित करणे,विद्युत व्यवस्था करणे,आरोग्य व स्वच्छता विषयक बाबी पुरवणे आदी कामे निधी अभावी अडचणीची झाली आहेत. नागरिकांनी मालमत्ता कर भरल्यास या सोयी सुविधा उपलब्ध करून देता येतील .जेजुरी शहरातील मालमत्ता धारकांनी कोणत्याही अफावांवर विश्वास न ठेवता घरपट्टी पाणीपट्टी भरून पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी मुख्याधिकारी निखील मोरे यांनी केले आहे.
To Top