पुरंदर ! पिंपळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विद्या खेनट यांची बिनविरोध निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 गराडे : प्रतिनिधी
 राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या पिंपळे (ता पुरंदर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विद्या बाळासाहेब खेनट यांची बिनविरोध निवड झाली.
          निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रूपाली सरतापे व   सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र जगताप यांनी काम पाहिले. यावेळी उपसरपंच किरण खेनट, ग्रामपंचायत सदस्या मीनाक्षी पोमण, उज्वला पोमण, सारिका दाते, गौरी गोफणे, शरद शिवरकर, अमोल पोमण, ग्रामसेवक शरद बिनवडे उपस्थित होते.
      सरपंच निवडीनंतर लोकनेते स्व. शिवाजीआप्पा पोमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
     सरपंच विद्या खेनट यांचा सन्मान पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ  दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, उद्योजक हरिभाऊ लोळे, पुरंदर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव युवा नेते अजिंक्य टेकवडे, राहुल गिरमे, धोंडीबा कटके यांनी केला.
     यावेळी शांताराम पोमण, विलास पोमण, प्रविण पोमण, विवेक दाते, सुहास पोमण,आप्पा खेनट,प्रकाश खेनट,अरुण खेनट, संदीप पोमण, सुरेश पोमण, अमोल पोमण, रामदास पोमण,  बाळासाहेब पोमण, योगेश गोफणे, दिगंबर पोमण, वैभव पोमण, शंकर खेनट, दिपाली खेनट,अनुजा पोमण,सुरेखा खेनट, वैशाली खेनट, विलास चव्हाण, युवराज रोमण, पप्पू ताम्हाणे, मयूर पोमण आदी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे प्रास्तविक अरूण खेनट यांनी केले. सूत्रसंचालन शांताराम पोमण यांनी केले .आभार श्रीमंत भनगे यांनी मानले.



To Top