सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
कोऱ्हाळे बुु नजीक माळशिकारेवाडी ता बारामती येथे रस्त्यात सापडलेले दागिन्यांचे पाकीट प्रामाणिकपणे परत केल्याने ओंकार सतीश चव्हाण या युवकाचे कौतुक होत आहे.
आज सकाळी ठीक आठ वाजता ओंकार कॉलेजला निघाले असता मारुती मंदिरासमोर रस्त्याने जात असताना त्यांना समोर एका पाकिट निदर्शनास आले व त्यांनी उचलून घेतले त्यात पाहिले तर महिलेचा गळ्यातील एक ते दीड तोळ्याचा दागिना असल्याचे दिसले. त्यांनी शेजारी आसपास चौकशी केली असता कुणाला काही सांगता येत नव्हतं त्याने क्षणाचा ही विलंब न लावता शरद माळशिकारे यांना संपर्क साधला व घटना सांगितली शरद माळशिकारे यांनी लगेच व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज करून सांगितले व मेसेज वायरल झाल्यावर संदीप बबन आढागळे यांचा फोन आला आणि त्याने सांगितले माझ्या आईचे हा दागिना आहे म्हणजे कार्तिका बबन आढागळे यांचा होता ते परत करताना ओंकार सतीश चव्हाण , कार्तिका बबन आढागळे, भगवान विठ्ठल माळशिकारे व शरद माळशिकारे हे उपस्थित होते.