सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महिला आणी मुलींन वर वाढते अत्याचार रोखण्या साठी जिल्ह्याचे पालकमंत्री आणी राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल अप्पर पोलिस अधीक्षक अजीत बोराडे यांनी महाविद्यालय आणी माध्यमिक विद्यालयातील मुलींना स्वसंरक्षणा साठी कराटे व इतर आवश्यक सामुग्रीच्या माध्यमातुन ७ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत प्रशिक्षण देण्याच्या सुचना दिल्या होत्या. दिलेल्या प्रशिक्षणातुन मुलींन मध्ये नराधमांना आडवे करण्याची जिद्द आणी हिम्मत मुलींनी करुन दाखविलेल्या प्रात्यक्षिकातुन दिसुन येत होते मुलींनी वाई पोलिस ठाण्याने प्रशिक्षणाचे केलेल्या आयोजनात स्वयमस्फृर्तीने सहभाग घेतल्याचा यशस्वी आनंद होत आहे.पुरुष वृत्ती कडुन येणार्या प्रत्येक प्रसंगाला दिलेल्या प्रशिक्षणाच्या धाडशी मार्गाचा अवलंब करुन मुली सहज आणी निर्भीड पणाने सामोरे जाऊ शकतात असा आत्मविश्वास वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी ऊपस्थित प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थीनींना ऊपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करुन समारोपाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते .
या वेळी वाईच्या डिवायएसपी शितल खराडे जानवे. वाई पोलिस ठाण्यातील सपोनि रविंद्र तेलतुमडे सातारा येथील महिला
सपोनि अंकिता मेणकर डिवायएसपी कार्यालयातील पोलिस ऊप निरिक्षक शंकरराव गायकवाड वाई शहरातील महिला दक्षता समितीच्या सर्व सदस्यासह फुलेनगर (वाई ) येथील प्रशिक्षण देणार्या पूनम शिरतोडे . वाई पोलिस ठाण्यातील अमीत गोळे सुप्रीया सापते आणी पोलिस कर्मचारी आणी वाई शहरातील किसनविर महाविद्यालय कन्याशाळा व्हिजन स्कुल महर्षी शिंदे गर्ल माध्यमिक विद्यालय यांचे
सर्व शिक्षक आणी २५० विद्यार्थीनी ऊपस्थित होत्या .
या वेळी वाईच्या डिवाय एसपी शितल खराडे जानवे मार्गदर्शन करताना म्हणाल्या वाई शहरा
सह तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला आणी मुलींनवर दुष्ट प्रवृत्तीच्या पुरूषांन कडून
वयाचे भान न ठेवता होत असलेले बलात्कार रोखण्या साठी मुलींना एसपी साहेबांच्या आदेशा नुसार प्रशिक्षण देण्यात आले त्याचा अन्याया विरुद्ध लढण्या साठी मुलींनी ऊपयोग करुन नराधमांना धडा शिकविण्याचे धाडसी पाऊस ऊचलले तरच ते नराधम वडणीवर येतील अधिक मदती साठी वाई पोलिस दल अहो रात्र तयार आहे पालकांनी देखील सावधगिरीचा पवित्रा घेऊन मुलींच्या पाठीमागे खंबीरपणे ऊभे रहावे असे आवाहनही त्यांनी बोलताना केले .
COMMENTS