सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाईच्या फॉरेस्ट कार्यालयात सावपणाचा आव आणुन वरिष्ठ अधिकारी आणी लोक प्रतिनिधींची दिशाभूल करत चमचेगिरी करत स्वताला रुस्तम समजणारा आणी फॉरेस्ट
कार्यालयाशी गद्यारी करून लाखो रुपयांची लुट
करणारा कार्यालयात सतत दहशत माजवुन आरेरावी करणारा आणी ऑडीडर ऑडीट करण्यासाठी येणार असे समजताच ज्या कागद पत्रांच्या मुळे आपली नोकरी जाणार अशी सर्व कागदपत्रे या पठ्याने रात्रीचे कार्यालयात उघडुन ती रातोरात जाळुन पुरावा नष्ट केल्याचे गंभीर पुरावे सातारा कार्यालयातील वरिष्ठांच्या चौकशीत उघड झाल्याने टग्या असलेला वनपाल वैभव शिंदे याला १ महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे तर दुसरा गंभीर कारवाईच्या जात्यात अडकला आहे. वास्तविक पाहता कुठल्याही फॉरेस्ट कार्यालयात काम करताना त्यांची बदली प्रत्येक ३ वर्षांनी करावी असा जिआर फॉरेस्ट कार्यालयाचा असताना देखील वनपाल वैभव शिंदे हा गेली कित्येक वर्षांपासून वाईतच वनपाल म्हणून कसा राहीला याचीही चौकशी वरिष्ठांनी करुन वाई कार्यालयाचे वैभव वाचवावे. त्याला सक्तीच्या रजेवर पाठवणे हि शिक्षा नागरिकांची दिशाभूल करणारी आहे तर खात्याशी गद्दारी करणार्याना कायम स्वरुपी निलंबित करावे. अशी मागणी वाई तालुक्यातील जनतेने केली आहे .
खात्याशी गद्दारी करणारे वरील वनपाल व त्याच्या टोळीत असणार्या सदस्यांचे पोलखोल वृत्त रोखठोक पणे 'सोमेश्वर रिपोर्टर' एक मार्च रोजी प्रसिद्ध केले होते .याच वृत्ताची दखल घेऊन वरिष्ठांनी चौकशी सुरु केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि ब्रिटिश काळा पासून वाई
शहरात फॉरेस्टचे कार्यालय आहे या कार्यालयातुन वाई तालुक्यातील वनक्षेत्रातील असणार्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या डोंगर रांगा मध्ये असणारे निसर्गाचे वैभव वनपाल आणी नागरिकांच्या सहभागातुन जोपासले जाते या क्षेत्रातील विना परवाना होत असलेली वृक्षतोड. वन्य प्राण्यांची होत असलेली शिकार विना परवाना लाकूड व
कोळसा वाहतुक. व ईतर गोष्टींचे बिनतक्रार कामकाज चालत असते .पण दुर्दैवाने गेली कित्येक वर्षां पासून येथे सुरु असलेल्या चांगल्या कामकाजाला गेल्या कित्येक वर्षांपासून वाईच्या कार्यालयात ठाण मांडून बसलेला
वैभव शिंदे याने याच ठिकाणी काही कर्मचारी
हाताशी धरून एक टोळी तयार करुन त्या मार्फत कार्यालयातील कर्मचार्यांन सह साहेबांनी मी सांगेल तेच झाले पाहिजे असा सुरु असलेल्या उर्मटपणा मुळे येथील अधिकारी आणी प्रमुख अधिकारी हतबल झाल्याचे दिसुन येत आहे. हि टोळी वाई तालुक्यात होत असलेल्या विना परवाना वृक्षतोडीच्या वखार मालकांशी अर्थपूर्ण तडजोडी करुन आज पर्यंत
लाखो रुपयांची माया गोळा केली तर अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांच्या होत असलेल्या शिकारी ठिकाणी हि टोळी पोहचते तेथे साहेबाला काही कळण्या आधीच लक्ष्मी दर्शनाचा लाभ घेऊन हे पसार होतात. तरी सातारा येथील वरिष्ठांनी या गंभीर घटनेची शहानिशा करुन वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या वनपालांची तातडीने उचलबांगडी करावी आणी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे महत्वाची कागद पत्र जाळली आहेत अशांन वर कठोर कारवाई करुन त्यांना निलंबित करावे अशी मागणी होत आहे. याचे वृत्त १ मार्च रोजी सोमेश्वर रिपोर्टरने प्रसिद्ध केले होते .
..