बारामती कोऱ्हाळे बु l येथील विठ्ठलदादा सोसायटीच्या अध्यक्षपदी माळशिकारे तर उपाध्यक्षपदी चव्हाण

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु विठ्ठलदादा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी माळशिकारेवाडीच्या अध्यक्षपदी भगवान विठ्ठल माळशिकारे तर उपाध्यक्षपदी नंदा बाळू चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
        यावेळी संस्थेचे मार्गदर्शक लालासाहेब माळशिकारे यांचे हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व संचालक मंडळ, सचिव तानाजी मिंड उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाटणे यांनी काम पाहिले. संस्थेने आजपर्यंत २ कोटी ७५ लाख कर्जवाटप तसेच सभासदाचे विमा उतरवणार आहे. ही संस्था कै. राजाराम बापू माळशिकारे आशीर्वादाने संस्थेच्या कामकाजाला सुरुवात झाली तसेच माजी कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, तसेच सुनेत्रा पवार यांचेही संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचे अशी माहिती संस्थेचे मार्गदर्शन लालासाहेब माळशिकारे यांनी दिली. 
To Top