सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी विद्यालयांमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वकर्तृत्वावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या सुनंदा गारडे व संगीता खवळे या उपस्थित होत्या सुनंदा गारडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलींनी सक्षम सक्षम व्हा स्वकर्तृत्वावर पुढे जा धर्म परंपरा सांगतात म्हणून कोणताही गोष्टी म्हणून नका तर स्वतः चिकित्सा करा प्रश्न विचारा त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा वाचन करत राहा वाचनाने तुम्हाला जगाचे ज्ञान मिळेल असे सांगितले तर संगीता खवळे यांनी त्यांची यशोगाथा आपल्या जीवन प्रवासातून मांडली.
यावेळी मुलींचा तसेच महिला शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय कांबळे यांनीही ग घरात किंवा शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचा लिंगभेद केला जाऊ नये मुलगा असो वा मुलगी दोघांनाही शिक्षणाच्या व्यवसायाच्या समान संधी मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुजाता वाबळे यांनी भूषवले पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन दहावीच्या विद्यार्थिनीने केले याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक रामचंद्र चव्हाणतसेच सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
COMMENTS