सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथे उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, महिला सबलीकरण आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील वंचित घटकातील आदर्श महिलांचा गुणगौरव या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक 8 मार्च 2022 रोजी करण्यात आले होते.
हा संपूर्ण कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आला. पहिल्या सत्रामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या विशेष कार्यक्रम प्रसंगी वंचित घटकातील ज्या महिलांची कामगिरी उल्लेखनीय आहे अशा महिलांचा विशेष गौरव करण्यात आला. सत्कारार्थी महिलांपैकी ऊसतोड मजूर कुटुंबातील संगीता निर्मळ या महिलेने टेलरिंगपासून सुरवात करत आता सात वर्ष यशस्वीपणे चालवत आहे, अश्विनी गाडेकर ही गृहिणी घरगुती पद्धतीने लोणचे बनवून दरवर्षी बारा पंधरा टन विक्री करण्यात यशस्वी झाल्या आहेत.
अबीता भोसले ही आदिवासी कुटुंबातील अशिक्षित महिला चारही मुलांना उचचविद्याविभूषित करत आहे, भारती फुमरास काळे व पल्लवी रवींद्र भोसले या महिला फळ विक्री व्यवसाय करून मुख्य प्रवाहात आल्या आहेत. मालन साठे ही आशा सेविका दोन मुलींना शिकविण्यासाठी आठवडे बाजारही करत आहे तर संगीता खवले यांनी धुणीभांडी करून पतीच्या मागे दोन्ही मुले उचचविद्याविभूषित केली. या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते महिला दिनानिमित्त गुणगौरव केला.
तसेच प्रतीक्षा कांबळे व शुभांगी गोसावी या राज्यस्तरीय पातळीवर खेळलेल्या मुलींचाही सत्कार केला गेला
कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौ सविताताई सतीश काकडे देशमुख, मा. सौ. रागिनी कुलकर्णी, वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक सौ नंदाताई सकुंडे, सौ पद्मजा काकडे देशमुख, सौ सुलभा काकडे देशमुख, माननीय दिपाली ननावरे, मुख्याध्यापिका बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रामध्ये बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत याच्या मुख्याध्यापिका दिपाली ननावरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. प्रविण ताटे देशमुख, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. संजू जाधव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अच्युत शिंदे, जवाहर चौधरी, डॉ. दत्तात्रय डुबल, संतोष शेळके, तनुजा गोफणे, मनीषा वाबळे, पूजा काकडे, रूपाली हाके, सुचीता नांदखीले, जया सणस, अर्चना शेडगे, वनिता कांबळे, मृणालिनी यादव व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. जया कदम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. रेश्मा पठाण व चेतना तावरे यांनी मानले व सूत्रसंचालन डॉ. कल्याणी जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला सबलीकरण समिती सदस्य सतीश लकडे व विनायक आगम यांच्या समवेत सर्व सदस्यांचे मार्गदर्शन लाभले.
COMMENTS