सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
भोर : संतोष म्हस्के
भोर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी शहरातील व्यवसायिक डाँक्टर यांच्या कडून पाच हजार रुपयाची लाच मागताना लाच प्रतिबंधक विभागाने वैद्यकीय अधीक्षक डाँ. अमित सरदेसाई यांच्यावर कारवाई करुन ताब्यात घेतले. भोर मध्ये मंगळवार ( दि. ८) रोजी शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटरची तपासणी करून अनियमितता आढळल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडे प्रतिकुल शेरा/अहवाल न पाठविणेसाठी आरोपी वैद्यकीय अधीक्षक डाँ. अमित सरदेसाई यानी तडजोडीअंती ५ हजार रूपयाची लाच मागणी करून स्वीकारली असता लाचपुचत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, ला.प्र. वि. पुणे व श्री. सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे यांनी केले आहे. ला. प्र. वि. पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे पुढील तपास करत आहेत.
COMMENTS