बारामती : शिरसाई कालव्याची जलवाहिनी दुसऱ्यांदा फुटली लाखो लिटर पाणी वाया

Pune Reporter

बारामती दि १९

 आज  शिर्सुफळ येथील शिरसाई कालव्याची जलवाही दुसर्यांदा फुटली आसुन लाखो लिटर पाणी वाया गेल्याने शेतकरी नाराजी  व्यक्त करत आसुन याला जबाबदार कोण? आसा सवाल येथील नागरीक करत आहेत.  एका वर्षात मध्ये दुसरी वेळ पाईपलाईन फुटण्याची वेळ आहे. दोनदा फुटली लाखो लिटर पाणी वाया गेले. या पाईप लाईन मधून साबळेवाडी ,गाडीखेल,कारखेल,भगतवाडी, या गावांमध्ये पाणी चालू होते.पाच पंप चालु होते. असे झगडे यांनी सांगितले.मागील ८ महिण्यापूर्वी म्हेत्रे वस्ती येथे फुटली व शेकडो लोकांच्या घरामध्ये पाणी व लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करून देखील तेथील लोकांना भरपाई मिळाली नाही.

     आज पंप हाऊस शेजारी जलवाहिनी फुटली त्या वेळी मोठा आवाज झाला येथील नागरिक भयभीत झाले आहेत.तर या घटनेला जवाबदार कोण असा सवाल येथील नागरिकांनी केला. पंप हाऊस येथील झगडे ऑपरेटर यांनी ऐकून पाच पंप चालू होते ते बंद केले.  भर उन्हाळ्यात पाईपाला फुटल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आसुन पाईपलाईन फुटण्यामागची कारणे शोधुन कायमस्वरूपी बंदोबस्त करावा आशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 




To Top