सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात जंगल मोठ्या प्रमाणावर असल्याने वन्यप्राण्यांची संख्या अगणित आहे. सद्या कडक उन्हाळा सुरू असल्याने जंगल परिसरातील पाण्याचे स्रोत आटले आहेत.वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची समस्या वाढल्याने वनविभागाकडून १५ कृत्रिम पाणवठे तयार केले असून त्यात पाणी सोडले आहे.यामुळे वन्यजीवांना कृत्रिम पांनवठे चांगलेच वरदान ठरत आहेत.
तालुका दुर्गम-डोंगरी तसेच डोंगर उताराचा असल्याने जंगलामध्ये पाणी फेब्रुवारी महिन्यांपर्यंतच टिकून राहते.नंतर जंगलातील पाण्याचे स्रोत आटले जातात.परिणामी वन्यजीवांना कडक उन्हाळ्यात अन्न-पाण्याच्या शोधार्थ मांववस्तीकडे धाव घ्यावी लागते.पाण्याच्या शोधार्थ भटकणाऱ्या अनेक वन्यजीवांवर मानववस्तीतील पाळीव हिंस्र प्राणी हल्ला करतात.यात अनेकदा वन्यजीव जखमी होतात तर काहींना जीव गमवावा लागतो.मात्र वनविभागाने वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची जंगल परिसरात कृत्रिम पानवठ्याद्वारे उत्कृष्ट सोय केल्याने वन्यजीवांना आधार मिळाला आहे.तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम पट्ट्यातील जंगलात बहुतांशी वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो त्यामुळे आंबवडे,नेरे,वरवडी,निगुडघर,हीरडोशी,वेळवंड खोरे परिसरात १५ छोट्या- मोठ्या पानवठयांमध्ये पाणी भरले गेले आहे.
--------------
मानाववस्तीत येणाऱ्या वन्यजीवांची हेळसांड करू नये
तालुक्यातील डोंगर परिसरांमध्ये वन्यजीवांना पाण्याची सोय कृत्रिम पाणवठे तयार करून केलेली आहे.पांनवठ्यामध्ये पाणी सोडलेले आहे.तरीही चुकून काही वन्यजीव मानव वस्तीकडे अन्न पाण्याच्या शोधार्थ आल्यास नागरिकांनी त्यांची हेळसांड करू नये असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ यांनी केले आहे.