सुपे परगणा ! सुपे सोसायटीत चुरशीची लढत : सत्तेच्या चाव्या कोणाकडे ? रविवारी फौसला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे विविध कार्यकारी सोसायटीच्या १३ जागांसाठी रविवारी (दि. १७ ) होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुक चुरशी होत असल्याने कोणत्या पॅनेलची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
               राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास सहकारी पॅनेलद्वारे १३ उमेदवार निवडणुक रिंगणात उभे आहेत. या उमेदवारांचे चिन्ह कपबशी आहे. येथे कोणीही पॅनेल प्रमुख नाही. येथील सर्वच उमेदवार पॅनेल प्रमुख म्हणुन काम करीत आहेत. मागिल पंचवार्षिकला निवडुन दिलेल्या संचालकापैकी बहुतांश उमेदवार पुन्हा रिंगणात उभे आहेत तर काही नवीन उमेदवार आहेत. मागिल पंचवार्षिकला केलेल्या विविध विकास कामांच्यामाध्यमातून पुन्हा हि निवडणुक लढवित असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत खैरे यांनी दिली. या सोसायटीची नविन इमारत बांधुन राहिलेल्या जागेतील भाडेतत्वावर गाळे दिले आहेत. त्यामुळे दरवर्षी सुमारे १ लाख २३ हजारांच्या वार्षिक उत्पन्नाचा स्त्रोत संस्थेला तयार करुन दिला असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. 
       तर शेतकरी विकास सहकारी परिवर्तन  पॅनेलचे १३ उमेदवार निवडणुक रिंगणात उभे आहेत. या पॅनेलचे नितीन खैरे, मनोज खैरे आणि अविनाश खैरे पॅनल प्रमुख आहेत. या पॅनेलमध्ये काही नव्या व जुन्या उमेदवारांचा संगम झालेला आहे. या पॅनेलचे किटली हे चिन्ह आहे. या पॅनेलने शेतकरी हिताचे व बॅंक धोरणाचे अवलंबन करणारे कर्ज धोरण आवलंबनार असल्याची माहिती पॅनेल प्रमुखांनी दिली. कृषी यांत्रिकीकरणांतर्गत विविध योजनांमधुन सभासदांना शेती अवजारांचा लाभ देणार असल्याचे वचन नाम्यात नमुद केले आहे. संस्था ठराविक लोकांची न राहता ती सर्वसामान्यांची तसेच त्यांना सन्मांनाची वागणुक देणार असल्याचे वचन नाम्यात नमुद केले आहे. शेती पारंपारिक न राहता शेती लघु उद्योग बनण्यासाठी सभासदांना प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रस्तापित संचालक मंडळाकडुन होणारी पिळवणुक थांबविण्यासाठी शेतकरी परिवर्तन पॅनेल निवडणुकीत उतरला असल्याची माहिती पॅनेल प्रमुखांनी दिली.  
           त्यामुळे रविवारी होणाऱ्या या निवडणुकीकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागुन राहिले आहे.
ही निवडणुक चुरशीची होणार असल्याने यामध्ये कोणता पॅनेल विजयी ठरणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
           ..........................................
To Top