सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
होळ(ता. बारामती) येथील पदमावती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी यशवंत भिकोबा कांबळे आणि उपाध्यक्षपदी विठ्ठल लक्ष्मण वायाळ याची निवड करण्यात आली.
संस्थेच्या करंजेपुल येथील संचालकमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी एम. टी. पाटणे आणि सहाय्यक अधिकारी म्हणून शुभांगी गोलांडे उपस्थित होते. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक मारुती वायाळ उपस्थित होते. संचालकमंडळ पुढीलप्रमाणे : मनोहर गणपत कारांडे, रामदास बापूराव वायाळ, प्रवीण आबाजी वायाळ, राजेंद्र निवृत्ती होळकर, खंडेराव बळीबा कर्चे, बाळासो मारुती वायाळ, आशादेवी विठ्ठल वायाळ, इंदुबाई रामदास वायाळ, सचिव शनि दादासो कांबळे.