सुपे परगणा ! सुप्यात डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
सुपे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी  जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त येथील समाज मंदिरा मधील महामानवाच्या पुतळ्यास पुष्प हार घालून धम्म गाथेचे पठण करण्यात आले.
           येथील जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. यावेळी खैरे, पोलिस उपनिरिक्षक सलीम शेख, संजय दरेकर आणि शौकत कोतवाल, ॲड. चंद्रशेखर जगताप आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी माजी सभापती निता बारवकर, सरपंच स्वाती हिरवे, माजी सभापती शौकत कोतवाल, मुनीर डफेदार, रेखा चांदगुडे, ज्योती जाधव, सुमन जगताप, दादा पाटील, शफिक बागवान, राहुल भोंडवे, महादेव जगताप, विलास धेंडे, सुशांत जगताप व समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंबेडकरकरांच्या पुतळ्यास तसेच राजर्षी शाहु महाराज आणि महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालुन मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी मिरवणुकीत झांज पथकासह ढोल ताशाच्या गजरात सायंकाळी येथील मुख्य पेठेतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी रंगेबीरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुयश जगताप यांनी केले. तर ॲड. गणेश धेंडे यांनी आभार मानले. यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सपोनी सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  दरम्यान चांडाळ चौकडीच्या करामती मधील बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव आणि सरपंच या कलाकारांनी सुपे येथील समाज मंदीरातील महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले. तर येथील सेवानिवृत्त शिक्षक भीमराव जगताप यांनी सोमेश्वर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांना मिठाईचे वाटप केले. याप्रसंगी सोमेश्वरचे माजी संचालक गणेश चांदगुडे, हनुमंत चांदगुडे, ॲड. विलास लोणकर, शंकर चांदगुडे आणि सुयश जगताप आदी उपस्थित होते.           _____________________
To Top