सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
बाबुर्डीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या १४ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आज जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्या शूभहस्ते तसेच जेष्ठ मार्गदर्शक हौसेराव पोमणे, आण्णा लव्हे, रामदास गायकवाड, सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, उपसरपंच सौ.दिपाली जगताप, बाबुर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन शांताराम ढोपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यामध्ये बाबुर्डी येथील स्मशानभूमी शेड १० लाख रुपये तसेच गायकवाड मळा येथील रस्त्याचे खडीकरण ०४ लाख रुपये किंमतीच्या विकासकामांचे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी गायकवाड मळा येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने सोमनाथ गायकवाड यांनी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्याकडे टँकरची मागणी केली असता तातडीने टँकर चालू करण्यात येईल असे आश्वासन भरत खैरे यांनी दिले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष किरण जगताप, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ढोपरे, राजकुमार लव्हे, लक्ष्मण पोमणे, गोविंद बाचकर, संतोष पोमणे, हनुमंत गायकवाड, योगेश जगताप, संतोष गायकवाड, दिपक खोरे, योगेश पोमणे, मोहन जगताप, संतोष गायकवाड तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.