दुर्दैवी ! सुपे येथे दुकानाचा बोर्ड डोक्यात पडून एक महिला मृत्युमुखी

Pune Reporter

सोमेश्वर रिपोर्टर टीम  
बारामती प्रतिनिधी  
बारामती तालुक्यातील सुपे येथे एका महिलेच्या डोक्यामध्ये दुकानाचा बोर्ड पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे .मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही महिला कुतवळवाडी येथील रहिवासी आहे .त्या कामानिमित्त बाहेर निघाले असता सुपे येथील एका दुकानाजवळ कुटुंबातील व्यक्तीची वाट पाहत  होत्या .
  
त्या ज्य‍ा इमारती जवळ उभ्या होत्या ती इमारत तीन मजली होती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून एका दुकानाच्या नावाचा टांगलेला बोर्ड वाऱ्या मुळे खाली पडला व तो बोर्ड थेट सदरील महिलेच्या डोक्यात पडला व तिला जबर जखम झाली त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले .या घटनेमुळे सुपे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे  

दुकानांचे बोर्ड ठरू लागले धोकादायक  
दुकानदार आपली ग्राहक संख्या वाढविण्यासाठी व आपली जाहिरात करण्यासाठी नको ते उपद्व्याप करत असतात   असतात  चौकात तसेच रस्त्याच्या साईडपट्टीला व इतरत्र ठिकाणी धोकादायक पध्दतीने बोर्ड लावले जातात या बोर्डची वजन जास्त असते हे लावत असताना कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी घेतली जात नाही ते बोर्ड फक्त  टांगले जातात त्यामुळे वादळी वाऱ्याच्या वेळेस ते हेलकावे खात   पडतात आणि अशा दुर्दैवी घटना घडतात त्यामुळे दुकानदारांनी आपले दुकानाच्या जाहिराती करत असताना ते योग्य पध्दतीने बोर्ड  (फलक) लावावेत योग्य ती काळजी घ्यावी असे नागरिकांचे म्हणणे आहे  .    
To Top