जावली ! महू-हातगेघर धरणग्रस्ताना न्याय न मिळाल्यास धरणाच्या भिंतीवर मशागत करू : धरणात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या संतप्त भावना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जावली : धनंजय गोरे
मूळ मालक जमीन ताब्यात देत नाही म्हणून रांजणीचे धरणग्रस्त विठ्ठल रांजणे यांनी काल विष पिऊन केलेल्या आत्महत्या प्रकरणाची दखल घेवून आज संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते आणि धरणग्रस्तांनी महू धरणावर जाऊन शासनाच्या पुनर्वसन दिरंगाई धोरणाचा जाहीर निषेध केला. यावेळी प्रसंगी आम्ही धरणाच्या भिंतीवर मशागत करून आम्ही शेती करणार असल्याचा इशारा यावेळी दिला.
          याबाबत अधिक माहिती अशी की काल रांजणी तालुका जावली येथील एका धरणग्रस्तांनी मूळ मालक जमिनीचा ताबा देत नाही आणि दमदाटी करतो म्हणून फलटण तालुक्यातील बरड येथे विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत जावळी तालुक्यातील धरंग्रस्तांमध्ये संतापाचे वातावरण पसरले सर्व धरणग्रस्त शुक्रवार रोजी सकाळी महू धरणावर जमा झाले.
यावेळी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कमलाकर भोसले, विश्वास रांजणे, रघुनाथ पवार, भीमराव रांजणे, ज्ञानेश्वर रांजणे, किसन रांजणे, मोतीराम गुरव आदी उपस्थित होते.
यावेळी शासनाच्या पुनर्वसन दिरंगाई धोरणाचा जाहीर निषेध करीत घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना कमलाकर भोसले यांनी आधी पुनर्वसन आणि मगच धरण या शासनाच्या घोषणेचे गाजर पुढाऱ्यांनी धरणग्रस्तांना दाखवले. खोटी आश्वासने दाखवून शासन धरणग्रस्तांना देशोधडीला लावत आहे. अशा धरणग्रस्तांना आत्महत्या करण्याची पाळी जर शासन आणत असेल तर आम्हाला आता योग्य तो निर्णय घ्यावाच लागेल असा सज्जड दम यावेळी दिला.

प्रकल्पग्रस्त ज्ञानेश्वर रांजणे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले शासनाचे अधिकारी, दलाल आणि भूमिअभिलेख यांच्या साटेलोट्यात आमची फरपट चालू असून धरण होवून वीस वर्ष उलटली तरी आम्हाला आमच्या वडिलोपार्जित हक्काच्या जमिनींचा मोबदला मिळत नसेल तर मात्र अधिकाऱ्यांनी लोकशाही धोक्यात आणली असून आम्हाला जर आता तातडीने न्याय मिळाला नाही तर आम्ही या हंगामात धरणाच्या भिंतीवर मशागत करून शेती करणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे.
To Top