सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मु. सा. काकडे महाविद्यालयातील एम. ए. मराठी या वर्गाचा विद्यार्थी पोपट जानकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात दि १२ मे रोज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मराठी विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल मानाचे सुवर्णपदक सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला.
यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे, महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, सहसचिव सतीश लकडे, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. जया कदम, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ताटे-देशमुख आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS