भोर ! 'राजगड'साठी शांततेत मतदान सुरू : एकूण २९ मतदान केंद्र

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--- --
भोर : प्रतिनिधी
 भोरला राजगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दि.२९ रोजी शांततेत मतदान सुरू आहे. 
        भोर -१८, वेल्हा -६, खंडाळा -३, हवेली -२ असे एकूण २९ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत सुरू आहे. मतदान केंद्रांवर सकाळी आठ पासूनच मतदारांनी गर्दी केल्याचे चित्र आहे.सर्वत्र मतदान शांततेत सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली. मतदान शांततेत पार पडण्यासाठी भोर पोलिसांकडून सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी सांगितले.

To Top