भोर ! जानू पारठे शिलेदार निष्ठेचे पुरस्काराने सन्मानित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
 माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यासमवेत गेली ५० वर्षाच्या राजकीय,सामाजिक जीवनात भोर तालुक्यात एक निष्ठेने काम केल्याबद्दल आपटी ता. भोर येथील माजी सरपंच तसेच बुजुर्ग सामाजिक कार्यकर्ते जानू आनू पारठे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हास्तरीय शिलेदार निष्ठेचे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.    
   पुणे येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले .यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते.   
 
To Top