सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
राजगड सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक आज रविवार दि.२९ रोजी शांततेत पार पडली.
२९ केंद्रांवर ४४ टक्के मतदान झाले.ही निवडणूक ७ जागांसाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपामध्ये झाली असून काँग्रेसच्या १० जागा निवडणुकी अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत.
मतदान हे भोर, वेल्हा,हवेली,खंडाळा तालुक्यातील मतदारांनी सकाळी ८ ते सायं ५ वाजेपर्यंत २९ केंद्रांवर पार पाडले.यात ६६७ स्त्रियांनी तर ५३२० पुरुषांनी असे एकुन ५९८७ सभासदांनी मतदान केले असून ४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.निवडणुकीचा निकाल ३१ मे ला जाहीर होणार आसल्याने भोरच्या मावळ्यांचे राजगडच्या निकालाकडे लागले आहे.