सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील महूडे खोर्यातील माळेवाडी( महुडे खुर्द )ता.भोर येथील शेतकरी शिवाजी सोपान बदक यांच्या घराला रविवार दि- ८ अचानक आग लागून आगीत पूर्णतः घरसंसार भस्मसात झाला.आगीत ५ लाखांच्या पुढे नुकसान झाले असून नशीब बलवत्तर म्हणून घरात बांधलेली जनावरे बचावली.
रविवार दि-८ सकाळी अकराच्या दरम्यान बदक यांच्या घरात मोठे धुराचे लोट गावातील तरुण व ग्रामस्थांना दसल्याने तरुणांनी आग लागलेल्या घराकडे धाव घेतली असता काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले.आगीत घरातील अन्न-धान्य, कपडा-लत्ता, जनावरांचा चारा,२८ हजारांची रोख रक्कम तसेच अन्य वस्तू जळून खाक झाल्या.आग विजवण्यासाठी काही वेळातच भोर नगर परिषदेच्या अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाचे जवान तसेच महुडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ व माळेवाडी येथील तरुण सरपंच आकाश कुमकर, शहाजी कुमकर, भरत कुमकर ,सदाशिव कंक आशा शेकडो जणांनी कसोशीने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.शिवाजी बदक यांचे घर पूर्णपणे भस्मसात झाल्याने घरातील कुटुंबाची रहाण्याची गैरसोय झाली आहे.