सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता बारामती येथील डॉ. रविंद्र सावंत यांची मोर्फाच्या (Maharashtra Organic and Residue Free Farmers Association) संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र ऑर्गनिक अँड रेसेड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन चे अध्यक्ष अंकुशराव पडवळे, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, प्रल्हाद वरे यांच्या वतीने राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते नुकतेच डॉ. सावंत यांना निवडीचे पत्र सुपूर्त करण्यात आले. दूध, पालेभाज्या, फळ यावर ही संस्था काम करते. या संस्थेला देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन असते.
COMMENTS