भोंदू बाबांच्या चमत्कारांपासून सावध राहा, अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष भापकर यांचे आवाहन : सह्याद्री पब्लिक स्कुलमध्ये 'अंधश्रद्धा' निर्मूलन जागृती कार्यक्रम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच इतर ज्ञान मिळावे, विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेचे दुष्परिणाम समजून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा या हेतूने एस. डी सह्याद्री पब्लिक स्कूल मध्ये आज २७ जून रोजी 'अंधश्रद्धा निर्मूलन जागृती' या विषयावर बाळकृष्‍ण सर्जेराव भापकर पुणे जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष यांचे व्याख्यान आयोजित केले होते .
          त्यांनी विद्यार्थ्यांना विचाराचे महत्त्व , आपल्याला पडणारे वेगवेगळे प्रश्न , वेगवेगळ्या विषयानुसार प्रत्येक प्रश्ना मागे काहीतरी कारणे असतात त्याचा शोध घ्या अशा अनेक विषयावर प्रबोधन पर माहिती सांगितली. भापकर यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळी प्रत्यक्षिक दाखवून भोंदूबाबा कशा प्रकारे दिशाभूल करून अंधश्रद्धा करतात व लोकांना फसवितात हे दाखविले . अंधश्रद्धेविषयी मुलांना पडणाऱ्या प्रश्नांचे त्यांनी निरसन केले. त्या वेळी संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, संस्थेचे आधारस्तंभ व मार्गदर्शक अंकुश सावंत ,सह्याद्री पब्लिक स्कूलचे प्राचार्य अजित वाघमारे, नेवसे ,सर्व शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते  कार्यक्रमाचे प्रास्तविक गौरी फरांदे यांनी केले.
To Top