सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी भोर एज्युकेशन सोसायटी संचलित राजा रघुनाथ राव विद्यालय भोर येथील कलाशिक्षक विश्वास शामराव निकम यांना राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार २०२२ पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे पार पडलेल्या माझी शाळा माझा फळा समूहाच्या वतीने दि. २८ व २९ मे पहिले अक्षर लेखन संमेलनात देवून गौरविण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सहसचिव वन आणि महसूल विभाग महाराष्ट्र शासन संजय इंगळे होते. विविध राज्यातून ३५० हून अधिक कलाकार सहभागी झाले होते. संमेलनात विविध दिग्गज कलाकारांचे प्रात्यक्षिक आयोजित केले गेले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध केली ग्राफर अनिल गोवळकर ,पुणे येथील मिलिंद फडके उपस्थित होते.संमेलनात राज्यातील ३० जणांना राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये भोर येथील राजा रघुनाथ राव विद्यालयचे कलाशिक्षक विश्वास शामराव निकम यांना सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकरी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, सन्मानपत्र, तुळशी पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. निकम यांच्या यशाबद्दल सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर ,सचिव विकास मांढरे व सर्व संस्थाचालक तसेच माननीय मुख्याध्यापक श दिपक शिवतारे विद्यार्थी यांनी अभिनंदन केले