सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागात गेले तीस वर्ष मैलकोली म्हणून तुकाराम गणपत रवळेकर यांनी कायमच सतर्क राहून सर्व सामान्य जनतेची सेवा करीत प्रामाणिकपणे काम केले आहे.असे शासकीय विभागात प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान होणे गरजेचे आहे.असे उदगार आमदार संग्राम थोपटे यांनी रवळेकर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात खानापूर ता.भोर येथे सपत्नीक सन्मान करताना काढले.
आमदार पुढे म्हणाले सेवापूर्ती कार्यक्रम व अभिष्टचिंतन सोहळा एकाच दिवशी हातावरच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांचाच होत असतो.त्यात रवळेकर यांचा समावेश आहे. बांधकाम विभागात प्रामाणिक केलेल्या कामाची रवळेकर यांना पावती मिळाली असल्याने हजारोच्या संख्येने जनसमुदाय त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे.यावेळी माजी जी.प.सदस्य विठ्ठल आवाळे ,राजगड संचालक उत्तम थोपटे ,मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती धनंजय वाडकर,सामजिक कार्यकर्ते अनिल सावले, माजी सरपंच चंद्रकांत नागरे ,जयवंत थोपटे,दादा रवळेकर,संपत दरेकर भानुदास धोपटे, जयवंत कोंढाळकर, दत्तात्रेय तनपुरे, माजी उपसरपंच आप्पा गोळे आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.