सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जेजुरी : प्रतिनिधी
माझिक बस इंडिया फौंडेशन, शिवस्नेह फाउंडेशन पुरंदर व विद्यामहामंडळ प्रशाला कोथळे यांच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्यसाधून विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत तयार केलेल्या सिडबोलची पावसाळ्याच्या तोंडावर निसर्गात उधळण केली . गॅलरीवाक, पर्यावरण प्रकल्प आदी उपक्रम यावेळी राबविण्यात आले .
पुरंदर तालुक्यातील कोथळे येथे श्री मल्हार शिक्षण मंडळाच्या विद्या महामंडळ प्रशालेत माझिक बस इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वृक्षांच्या बीयां गोळा केल्या . विद्यालयात या बियांचे तीन हजार सीडबोल तयार करण्यात आले .तसेच सुट्टी च्या काळात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी निसर्गाची माहिती मिळवून गॅलरीवाक तयार करण्यात आली .
शनिवार दि 4 रोजी शाळेच्या प्रांगणात पर्यावरण गॅलरीवाकचे उदघाटन कोथळे गावचे सरपंच शहाजी जगताप , श्री मल्हार शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी संस्थेचे संचालक रवींद्र जगताप, तंटामुक्त संघाचे अध्यक्ष प्रमोद जगताप,दत्तात्रय भोईटे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, आकाश शिळीमकर,मझीक बस इंडियाच्या हर्षदा शिळीमकर,प्रताप भोसले,मुख्याध्यापक नितीन राऊत,एकनाथ देवकर, कला शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक साबळे, समाजकल्याण विभागाचे अधिकारी विलास जावळे, सुनील दोडके उपस्थित होते .
मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाची हानी झाली आहे . पर्यावरणाचे रक्षण व्हावे,जनजागृती व्हावी या हेतूने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्यसाधून यावेळी सर्व उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी निसर्गात सीडबोलची उधळण केली . यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली .
मझीक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने या विद्यालयात शैक्षणिक स्तर,विविध मनोरंजनाचे खेळ,आरोग्यविषयक माहिती,आर्थिक व्यवहार,बँकेचे व्यवहार,सुट्टीच्या काळात वाचन, विविध स्पर्धा ,पर्यावरणरक्षण आदी उपक्रम राबविले जात असल्याचे संदीप जगताप व हर्षदा शिळीमकर यांनी यावेळी सांगितले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप जगताप तर आभार आकाश शिळीमकर यांनी मानले .