भोर ! उन्हाच्या चटका वाढल्याने आठवडे बाजारात शुकशुकाट : व्यापारी उकाड्याने हैराण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
जून महिना उलटत आला तरी पावसाने दडी मारल्याने उन्हाचा वाढता पारा कायम आहे. उन्हाच्या वाढीव चटक्यामुळे नागरिक घराबाहेर पडने पसंत करीत नसल्याने  भोरला मंगळवारच्या आठवडे बाजारात शुकशुकाट आहे.
     मान्सूनची आतुरतेने वाट पाहत नागरिक खरीप पेरणीच्या शेती मशागतीत व्यस्त असल्याने तसेच कडक उन्हाचा चटका वाढल्याने बाजार पेठ व आठवडे बाजारात नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.मात्र बाजारातील व्यापारी ग्राहकाची वाट पाहत उकाड्याने हैराण झाले आहेत         
----------------
खरीप पेरणीपूर्व शेती काम व उकाड्यामुळे बाजार ठप्प तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीप पेरणीपूर्व शेती मशागती सुरू आहेत तसेच वातावरणात महाभयंकर उकाडा असल्याने मागील दोन आठवडे बाजार नागरिक ग्राहक खरेदीसाठी फिरकेना झाले आहेत.यामुळे बाजार ठप्प झाले आहेत
To Top