सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
बाबूर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या स्विकृत संचालकपदी नानासाहेब पांडूरंग लडकत तसेच हनूमंत गणपत गायकवाड यांची आज संस्थेच्या मासिक मिटिंगमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी दोन्ही नविन संचालकांचा सत्कार करण्यात आला नुकतीच या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक ही बिनविरोध होऊन १३ संचालकाची निवड करण्यात आली होती या निवडीवेळी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पोमणे,माजी सरपंच अंकुश लडकत संस्थेचे चेअरमन शांताराम ढोपरे व्हाय चेअरमन उत्तम लडकत बाबुर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ढोपरे, राजकुमार लव्हे, रामदास गायकवाड ,संस्थेचे सचिव संजय झगडे, सहसचिव प्रमोद देव तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते निवडीनंतर संतोष पोमणे आणी गोरख लव्हे यांनी सर्वांचे आभार मानले.