सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर उपजिल्हा रुग्णालय येथे आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक स्वरुपा संग्राम थोपटे यांनी मोफत महाआरोग्य ,उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन रविवार दि.१२ रोजी केले होते. शिबिरात २७०० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी हृदयाच्या शस्त्रक्रिया, किडनी स्टोन, मेंदू शस्त्रक्रिया, पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे शस्त्रक्रिया ,हाडांचे विकार,मोफत नेत्र तपासणी,अपेंडिक्स किडनी आजार या मूळ आजारासह अनेक आजारांवर रुग्णांच्या तपासण्या करून उपचार करण्यात आले.या शिबिरासाठी डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी चिंचवड ,भारती हॉस्पिटल पुणे व श्लोक हॉस्पिटल खेड-शिवापूर यांचे विशेष सहकार्य लाभले.तर यावेळी आशा सेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि.प.सदस्य विठ्ठल आवाळे,गीतांजली आंबवले,दिनकर धारपाळे,अमोल नलावडे,नाना राउत,राजगड संचालक उत्तम थोपटे,सामाजिक कार्यकर्ते अनिल सावले,डॉ.सूर्यकांत कराळे,डॉ.आनंद साबणे,नगराध्यक्ष निर्मला आवारे,उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर,गीतांजली शेटे,नगरसेवक गणेश पवार,अमित सागळे,सुमंत शेटे,गणेश मोहिते,जगदीश किर्वे,बजरंग शिंदे,संपत दरेकर,लक्ष्मण पारठे,सरपंच अशोक तुपे,राजू शेटे उपस्थित होते.