सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजे ता बारामती येथे रस्त्यावर पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने गेले सहा माहिन्यांपासून अज्ञातवासात गेलेला बिबट्या पुन्हा सक्रिय झाला आहे. याबाबत प्रथमदर्शनी पाहणारांनी ही माहिती दिली.
आज सोमवार असल्याने करंजेपुल येथील हरिष गायकवाड व मंगेश गायकवाड हे सोमेश्वर देवस्थान येथून परतत असताना करंजे येथील वड्यातून रस्त्यावर आलेल्या बिबट्याचे दर्शन रात्री आठ वाजण्याच्या सुमारगड या दोघांना झाले असल्याचे त्यांनी सांगितले. बिबट्याला लपण्यासाठी जागा असलेल्या उसाला गेले सात महिन्यापासून तोड सुरू झाल्याने गेले सात महिने बिबट्या कोणालाही दिसला नाही. मात्र आता लहान उस मोठा झाला असल्याने बिबट्याच्या मुक्कामाची सोय झाल्याने त्याने पुन्हा लोकांना दर्शन देण्यास सुरुवात केली आहे.