पठ्यानं.... आठ विजवाहक पोल उभे करून नेली स्वतःच्या शेतात अनाधिकृत वीजजोड : वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोनवडी सुपे येथील एकाने स्वतःच्या शेतात आठ विजवाहक पोल उभे करून त्यावर अल्युमिनियम च्या तारा ओढून महावितरणला न विचारता विजेची चोरी केल्याप्रकरणी एकावर वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
        याबाबत सचिन दगडु माने वय-४३ वर्षे व्यवसाय- वरिस्ट तंत्रज्ञ, बारामती ग्रामीण शाखा  महावितरण रा. उर्जा भवन कॉलनी बारामती ता. बारामती यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिसांनी प्रविण शिवाजी नवले रा. मळद ता. दौड जि. पुणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रविण शिवाजी नवले रा. मळद ता. दौड जि. पुणे यांनी सोनवडी सुपे गावचे हददीत वावगेवस्ती येथे जमीन गट नं ३४ मध्ये ८ सिमेंटचे पोल व त्यावर अँल्युमिनीयम च्या तारा ओढुन सदरचे पोलवरून अँल्युमिनीयम च्या तारामार्फत माहावितरणचे अधिकृत लाईनमधुन दि.28/05/2022 रोजी ते दि. 03/06/2022 रोजीचे दु. 03.00वा चे दरम्यान विज प्रवाह बेकायदेशिरपणे विनापरवाना जोडुन घेतल्या बाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स फौ. जाधव करत आहे.
To Top