बारामती ! मुढाळे गावचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक सेवानिवृत्ती सोहळा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
प्रतिनिधी : सुनील जाधव                
मुढाळे गावचे सुपुत्र  संजय कुशाबा थोरात हे नुकतेच आपल्या पोलिस सेवेतून निवृत्त झाले.३९ वर्ष ६ महिने सेवा हा त्यांचा यशस्वी उत्कृष्ट असा अतिशय प्रामाणिक व मेहनती स्वभाव त्यांचा प्रवास, १९८३ वर्षे भरती झालेले थोरात साहेब प्रथम घोडगाव या अतिशय दुर्गम भागात सुरुवात करून इंदापूर,मंचर वालचंदनगर,दौंड, लोणीकाळभोर  अशा अनेक ठिकाणी सेवा करत,असताना दरोडा,जबरी चोरी,खून इतर अनेक गुन्हे उघडकीस आणलेले. मोका या कायद्याअंतर्गत अनेक गुन्हे व तपास करत अनेका वरती मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. समाजात राहत असताना अनेक सामाजिक कार्य, गोरगरिबांना  मदतीचा हातभार. २२५ बक्षिसे उत्कृष्ट कामगिरीबद्दल गुनेविभागकडून अनेक गुन्हे उघडकीस म्हणून उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार, गौरव चिन्ह मिळाले.सेवानिवृत्तीनंतर समाजसेवा व युवकांना मोलाचे मार्गदर्शन समाजकार्य करण्याचे आश्वासन. कुटुंब एक मुलगा सुजय थोरात, दोन मुली,दोन नातू,पत्नी,सून आहे. अनेकांचे प्रेरणास्थान सिंघम म्हणून ओळखले जाणारे थोरात साहेब यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला. यावेळी समस्त ग्रामस्थ उपस्थित राहिले. यशवंत देवकर, हनुमंत जाधव,रामचंद्र जाधव, अनिल जाधव, सुधीर जाधव,संतोष पापळ,आकाश बालगुडे,सुनील जाधव यांनी उपस्थित राहून सत्कार समारंभ पार पडला.
To Top