सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मुंबई :
माजी मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोराना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विट करीत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.
फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे.
फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याने सध्या ते गृहविलगीकरणात आहेत. राज्यसभेसाठी येत्या 10 जूनला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीला ते उपस्थित राहणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
दोन दिवसापासून फडणवीस यांना ताप येत होता. ते काल लातूरला होते. तेथून ते सोलापूरला जाणार होते. सोलापूर दौरा रद्द करुन फडणवीस मुंबईला परतले. मुंबईला आल्यावर त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.