सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पुर्वेकडील भोंगवली ता.भोर येथील जवान नवनाथ शंकर भांडे वय ४१ हे छत्तीसगड रायपूर येथे शुक्रवार दि.३ शहीद झाले होते.त्यांच्या पार्थिवावर भोंगवली येथे शासकीय इतमामात नवनाथ भांडे अमर रहे च्या घोषणा देत रविवार दि.५ रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद जवान नवनाथ शंकर भांडे हे छत्तीसगड रायपूर येथे सियारपीएफ मध्ये कर्तव्यावर असताना शहीद झाले होते.त्यांच्या मूळगावी राजकीय,सामाजिक तसेच अनेक आप्तेष्ट नातेवाईक यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या मागे आई, पत्नी ,एक मुलगा ,एक भाऊ असा परिवार आहे.भांडे यांच्या शहीद होण्याने भोंगवली गावावर तसेच परिसरातील पंचक्रोशी मध्ये शोकाकुल वातावरण होते.