सभासदांनो...! वेळेत ऊस लागवड करताय ना ? कारखान्याचा तुमच्यावर 'वॉच' आहे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा आडसाली ऊस लागवड हंगाम सद्या सुरू असून कारखान्याने ठरवून दिलेल्या नियमावतील ऊस लागवडी होतात का नाही याबाबत कारखाना प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. 
        लागण हंगाम सन २०२२ - २०२३ आडसाली लागण पाहणी दौरा चौधरवाडी, वाकी, चोपडज, सस्तेवडी, मगरवाडी, करंजे, करंजेपुल, शेंडकरवाडी, सोरटेवाडी आदी गावांमधून पाहणी दौरा केला. या वेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषीकेश गायकवाड,  शेतकी अधिकारी बापुराव गायकवाड, ओशर अजित जगताप तसेच प्रत्येक गावचे चिटबॉय उपस्थित होते.
            अडसाली ऊस लागण नियम बाह्य होते. त्यादिवशी होत नाहीत त्यामुळे शेतकी विभागाच्या वतीने उसलागवड पाहणी दौरा आयोजित केला  होता. तसेच आडसाली उसाचे प्रमाण वाढल्याने कारखान्याला ऊस गाळपाला ताण येत कारणाने शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडी कमी करून सुरू व पूर्व हंगामी उसलागवडी वळावे याचे देखील मार्गदर्शन करण्यात आले
To Top