राजवर्धन शिंदे अध्यक्ष असताना मी त्यांना त्रास दिला पण.....! २० वर्षानंतर सतीश काकडे यांनी वाढदिवशी दिला जुन्या आठवणींना उजाळा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---   
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आज शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सोमेश्वर कारखान्याचे मा. अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी आपल्या भाषणातून त्यावेळी मी अध्यक्ष असताना सतीश काकडे यांनी मला खूप त्रास दिला.         
असे सांगितल्यावर यावर सतिश काकडे यांनी नम्रपणे ही बाब मान्य करत सतीश काकडे म्हणाले राजवर्धन दादा तुम्ही अध्यक्ष असताना व मी संचालक मंडळात असताना मी तुम्हाला त्रास दिला ही बाब जरी खरी असली तरी पण मी तो माझ्या वयक्तिक स्वार्थासाठी दिला नसून शेतकऱ्यांसाठी दिला आहे. त्याच्या हक्कासाठी दिला आहे. आणि त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना झाला आहे. असे सांगत २० वर्षापूर्वीच्या आठवणी सतीश काकडे यांनी ताज्या केल्या.                पुढे ते म्हणाले, त्यांना त्रास देऊन देखील दादा हे मोठ्या मनाचे माणूस आहेत त्यांना त्रास देऊनही समाजात अशी खूप कमी लोकं असतात स्वतःला त्रास होऊनही पुढच्याच कौतुक करतात. अशा शब्दात सतीश काकडे यांनी राजवर्धन शिंदे यांची स्तुती केली. 
           आपल्या भाषांतून राजवर्धन शिंदे म्हणाले की, काकडे यांनी मला जरी त्रास दिला असला तरी तो चांगल्यासाठी दिला होता. त्यांनी विरोध केल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला. चांगला हेतू ठेऊन चांगलं काम करत गेलं तर समाजात चांगलं व्यक्तिमत्त्व तयार होतं. ते आज सतीश काकडे यांचे झाले असल्याचे कौतुक शिंदे यांनी आपल्या भाषणातून केले. 

To Top