बारामती ! सतीश काकडे हे शेतकऱ्यांची चौफेर बाजू मांडणारे व्यक्तिमत्त्व : बाळासाहेब सोळस्कर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सतीश काकडे म्हणजे शेतकऱ्यांसाठी आपलं आयुष्य अर्पण करणारे अवलिया व्यक्तिमत्त्व आहे.परखड विचार स्पष्ट बोली त्यांच्या मूळ स्वभावातच. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या व्यासपीठावर जाऊन शेतकऱ्यांची परखड बाजू मांडणार व्यक्तिमत्त्व म्हणजे सतीश काकडे असल्याचे गैरवोद्गार मुंबई बाजार समितीचे मा.अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांनी काढले. 
            सोमेश्वरनगर ता बारामती येथे  शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुबिलियंट इन्ग्रेव्हीयचे अध्यक्ष सतीश भट होते. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, उद्योजक आर एन शिंदे, सोमेश्वर चे मा अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, जितेंद्र निगडे,अभिजित काकडे, प्रकाश काकडे, सपोनि सोमनाथ लांडे, शहाजी जगताप, गुलाबराव गायकवाड, नितीन कुलकर्णी, संजय घाडगे, विकास केंजळे, प्रा देविदास वायदंडे, प्रा महेंद्र जाधवराव, भीमराव बनसोडे, कांचन निगडे, विराज काकडे, राजेश काकडे, नारायण निगडे आदी मान्यवर उपस्थित होते. सोळष्कर पुढे म्हणाले, सतीश काकडे आणि प्रमोद काकडे यांनी काकडे कुटुंबियांचे नाव अजूनही महाराष्ट्राच्या कोपऱ्यात जिवंत ठेवले आहे. कार्यक्रमात सतीश भट, राजवर्धन शिंदे, सुरेश शेंडकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
         कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा. अच्युत शिंदे यांनी केले.
To Top