सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
परिंचे : वार्ताहर
परिंचे ( ता. पुरंदर) येथील श्रीनाथ कृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य दिलीप सोपानराव यादव यांची व उपाध्यक्षपदी मुरलीधर यादव यांची सलग सहाव्यांदा बिनविरोध निवड झाली . यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक पुरंदर श्रीकांत श्रीखंडे व पतसंस्थेचे सरव्यवस्थापक धर्माजी यादव यांच्या उपस्थितीत ही निवडणुक प्रक्रिया पार पडली .
जवळपास सात हजार सभासद संख्या व संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या ह्या पतसंस्थेची सन २0२२ -२३ ते २०२७ _२८ ह्या कालावधीसाठी संचालक मंडळ निवडणुक बिनविरोध पार पडली होती . या पदाधिकारी निवडीच्या वेळी सर्व संचालक मंडळ तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड , राहुल धुमाळ , दादा गायकवाड , अशोक पोमण , कांतीलाल काळमोर , विलास वाघोले , विलास यादव , भुजंगराव यादव , दत्तात्रय यादव व संस्थेचे सर्व अधिकारी उपस्थित होते .
यावेळी बोलताना दिलीप यादव म्हणाले की पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात छोटया भाग भांडवलावर ३० वर्षापुर्वी स्थापन केलेल्या संस्थेचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे . राज्यभरात विविध ठिकाणी अकरा शाखा कार्यरत असुन संस्थेचे जवळपास शंभर कोटी रुपये चे खेळते भाग भांडवल व जवळपास ७५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. येणाऱ्या काळात संस्था अशीच उत्तरोत्तर प्रगतीची शिखरे गाठेल त्यासाठी आम्ही सर्व संचालक व पदाधिकारी कटीबध्द आहोत असे प्रतिपादन चेअरमन दिलीप यादव यांनी केले. या निवडीबददल महाराष्ट्र राज्याचे मा . मंत्री श्री.विजय शिवतारे व शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख व मा . मंत्री श्री. सचिन अहिर यांनी श्री. दिलीप यादव यांचे अभिनंदन केले
COMMENTS